Friday, June 3, 2011

आय.पी.एल. च्या 'मनाचे श्लोक' 1

मना ना काळे, काय किती गुंतवावे

पोलार्डला घ्यावे, की ब्राव्होला घ्यावे,
मोजावी किंमत, आपण मोठी जंगी
तरी शेवटी ही, गाजराचीच पुंगी.

सायमंडने नुसते, मधुचंद्रास यावे
इतरांनीसुद्धा, त्या संगे असावे,
'मुंबई'ने शेवटी, केलाच धावा
मग 'देवा'ने केल्या, सर्वांच्या धावा.

गंभीरने नेमकी, काय करामत केली
'रायडर्स'ची स्वारी, 'सेमी'त नेली,
एकसारखे हारण्याची, सवय आता गेली
एस.आर.के.च्या गाली, खळ्याची खेळी.

वेळ आली होती, पण काळ आला नव्हता
नानेस गेल्याने, 'काळ्या' आला होता
'ख्रिश'ने दाखवला, त्याचा झंझावात 
'रा.वन' ने मारला, कपाळावर हात.

बोलायचे खूप नी, करायाचे कमी
पुण्याची ही तर, सवय मोठी जुनी
'दादा'ही नाही, देऊ शकला 'सहारा'
नव्यांनी दिला, तळाशी पहारा.

-- क्रिकेट स्वामी --
उर्वरित श्लोक पुढील काही दिवसात पठणास मिळतील, याची वाचकांनी नोंद घ्यावी... :)