Wednesday, May 18, 2011

मी केलेली कविता

आज म्हटलं कविता करूया
ए ला ए, ओ ला ओ जोडुया
काहीतरी मस्तं लिहूया
Fb वर टाकून LIKES घेऊया.

सुरवातीलाच अडखळलो कोणता घेऊया विषय
असं प्रेम वगैरे की जीवनाचा आशय
मग म्हटलं, सोड यार विनोदीच बरं
ते नक्की झेपेल हेच शेवटी खरं

मग पहिली ओळ लिहली.
'आज अचानक असं कसं झालं,
तिला माझ्याकडे बघून हसावंसं वाटलं!'
कसं पूर्ण करू हे 'वाटलं'चं घाटलं
या प्रयत्नात 'विनोदा'चं बाजूला राहिलं.

जमत नाही म्हटल्यावर चंगच बांधला
कवी-श्रेष्ठ राहू दे, आपल्यासाठी 'रोसेश'सुद्धा चांगला.
निदान त्याच्यासारखं तरी लिहून बघू
बिल्ली करे म्यांव और चुहे करे चू चू

ते वाचल्यावर माझं मलाच झेपलं नाही
लक्षात आलं, 'काव्य' हे आपलं राज्य नाही
पण....
पण... एक दिवस मी 'चारोळी' तरी लिहीन
यमक न जमल्यास, absurd म्हणवून घेईन!

-- आशय सहस्रबुद्धे

I request you all readers, to suggest a title for this poem...